नवी मुंबईमध्ये वाशी रेल्वे स्थानकात रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना राजेंद्र खांडके नामक (वय वर्ष ४८) व्यक्तीचा लोकल खाली अडकून मृत्यू झाला.. प्रवाशांनी रुळ आणि प्लॅटफॉर्म यामधील अंतरातून बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आणि चक्क लोकल हलवण्याचाही ही प्रयत्न केला. ह्या दुर्घटनेत राजेंद्र खांडके हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु ते जबरदस्त जखमी झाले असल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दखल केले होते..मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली आहे..