ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाली. त्यानंतर केंद्रीय वन विभागानेही हिरवा कंदील दाखविला आहे. ठाणे ते बोरिवली मधील अंतर अगदी 20 मिनिटांत गाठता यावे म्हणुन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ११.८ किमी लांबीचा भुयारी प्रकल्प राबवित आहेत.या प्रकल्पासाठी १६,६००.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित केला आहे . या मार्गात १०.२५ कीमी लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे. तसेच या प्रकल्पाचे काम हैद्राबादच्या मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. फेब्रुवारीतल्या पहिल्याच आठवड्यात केंद्रीय वन्यजीव मंडळांने या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे. या प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात येणार येईल..